पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सीताफळ पिकासाठी 31 जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

सीताफळ पिकासाठी 31 जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

लातूरदि. 15 (जिमाका) : पुनर्रचित हवामान आधिारित फळपिक विमा योजना खरीप हंगाम सन 2024 साठी  लागू असून यासाठी पीक विमा पोर्टलवर फळपिक विमा नोंदणी सुरु आहे. ही योजना अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू असून या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सिताफळ फळपिकासाठी प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै2024 पर्यंत आहे.

 

फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी सातबारा उताराआधारकार्डबँक पासबुकस्वंय घोषणापत्रफळबागेचा जिओ टॅगिंग फोटो इत्यादी कागदपत्रे घेवून जवळच्या सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्रराष्ट्रीयकृत बँकसहकारी बँक येथे अर्जाची नोंदणी करावी आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभाग www.pmfby.gov.in किंवा 14447 या कृ‍षि रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरुन घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु