मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी, एजंटची मदत घेवू नका -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

                          मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची

प्रक्रिया अतिशय सोपी, एजंटची मदत घेवू नका

-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         उदगीर येथील अर्ज स्वीकृती शिबिराला भेट

·         ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांना केले मार्गदर्शन

·         जास्तीत जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 16 (जिमाका) :

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी कोणत्याही एजंटची मदत घेण्याची किंवा शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटातील प्रेरिका मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच एजंटपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी उदगीर नगरपरिषदेने तळवेस येथील सामाजिक सभागृहात आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी अधिकारी जावेद शेख, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वा


वलंबी बनण्यास मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या अंगणवाडीमध्ये किंवा अर्ज स्वीकृती शिबिरात आपले ऑफलाईन अर्ज द्यावेत. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटाच्या प्रेरिका (सीआरपी) यांच्या माध्यमातून हे ऑफलाईन अर्ज कोणतेही शुल्क न आकारात ऑनलाईन करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच सर्व महिलांनी आपले स्वतःचे अर्ज भरून द्यावेत. आपल्या आजबाजूच्या महिलांनाही या योजनेची माहिती देवून अर्ज भरण्याचे आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने आयोजित शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधून त्यांच्याकडून योजनेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच यावेळी उपस्थित महिलांना मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

***** 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु