विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार, रुपये 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार

 विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकपत्नीपाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार, रुपये 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार

लातूरदि. 08 (जिमाका) : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकपत्नीपाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार व रुपये 25 हजार पुरस्कार देण्यात येतो. अशा व्यक्तींनी 20 सप्टेंबर2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी केले आहे.

खेळातील पुरस्कारसाहित्यसंगीतगायननृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार,  इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेले पाल्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीसाठी पुरस्कार, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे आणि सामजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे माजी सैनिकपत्नीपाल्य यासाठी पात्र राहणार आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु