राज्य परिवहन आगारातील ‘प्रवासी राजा दिन’ आणि ‘कामगार पालक दिन’चे वेळापत्रक जाहीर

 राज्य परिवहन आगारातील ‘प्रवासी राजा दिन’ आणि

‘कामगार पालक दिन’चे वेळापत्रक जाहीर

लातूरदि. 11 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने 15 जुलै, 2024 पासून प्रवाशाच्या समस्यातक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्यातक्रारीसूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशाचे समाधान होवून प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईलअसे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.

राज्य परिवहन लातूर विभागातील आगारात विभाग नियंत्रक प्रवासी राजा दिन व कामगार पालक पालक दिनाला 15 जुलैपासून सुरुवात होईल. 15 जुलै, 2024 रोजी अहमदपूर, 19 जुलै, 2024 रोजी उदगीर, 22 जुलै, 2024 रोजी निलंगा, 26 जुलै, 2024 रोजी लातूर येथे, तर 29 जुलै, 2024 रोजी औसा येथे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित केला जाणार आहे.

या वेळापत्रकानुसार राज्य परिवहन आगारात सकाळी 10 ते दुपारी या वेळेत प्रवासी राजा दिन आयोजित केला जाईल. यावेळी प्रवासीप्रवासी संघटनाशाळा-महाविद्यालये आपल्या समस्यातक्रारीसूचना लेखी स्वरुपात मांडू शकतात. प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी ते सायंकाळी या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार असून या वेळेत संघटना व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरीकर्तव्यासंबंधीवेळापत्रकासंबंधी व प्रमादिय कारवाई) तक्रारी लेखी स्वरुपात घेवून तक्रारींचे तात्काळ निराकरण करतील. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी व राज्य परिवहन कामगार यांनी याचा लाभ घेवून आपल्या समस्याचे निराकरण करुन घ्यावेअसे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु