माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना

 माजी सैनिकविधवांच्या पाल्यांसाठी

कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना

लातूरदि. 08 (जिमाका) : माजी सैनिकमाजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या पाल्यांसाठी कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन 2023-2024 मध्ये दहावी व बारावीमध्ये 60 टक्केपेक्षा अधिक गुण घेवून पास झालेल्या आणि वैद्यकीयअभियांत्रिकीबी.एससीबी.ए.डिग्री कोर्सेसबी.सी.ए.बी. फार्मबी.एडएल.एल.बी. व एम.फार्ममध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

माजी सैनिकविधवा यांच्या पाल्यांच्या नवीन व जुनी शिष्यवृत्ती 2023-24 साठी 15 ऑक्टोबर2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयलातूर येथे कार्यालयीन वेळेत येवून अर्ज सादर करावेत. तसचे याबाबत इतर माहिती व अर्ज कार्यालयात मिळतील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु