शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत चर्चा

                                                  शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत

क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत चर्चा

लातूर दि. 30 (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 मध्ये शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाविषयी 29 जुलै, 2024 रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये क्रीडा शिक्षकांच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लगडे यांनी प्रास्ताविकामध्ये क्रीडा शिक्षकांनी जास्तीत जास्त खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत क्रीडा शिक्षकांना आवाहन केले.

उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी क्रीडा शिक्षकांनी आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये किमान एक तरी राष्ट्रीय खेळाडू घडावावाअसे आवाहन केले.

या बैठकीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमारे 500 क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये श्री. बानवलेकर यांनी ऑनलाईन प्रवेशिका भरेणेखेळाडू ओळखपत्र तयार करणे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळेनिलंगा तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराडरेणापूर क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंडे, चंद्रकांत लोदगेकरक्रीडा अधिकारी कैलास लटकेकृष्णा केंद्रेबाळासाहेब इंगोलेधीरज बावणे उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु