अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा होणार पुरवठा

 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता

बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा होणार पुरवठा

·        10 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूरदि. 09 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. सन 2024-2025 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र बचतगटांनी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 8 मार्च2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र बचतगटांनी  10 ऑगस्ट 2024 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त एस. एन.चिकुर्ते यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु