महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन

 महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन

लातूर दि. 30 : महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचारप्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे.

महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी महसूल विभागामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 ऑगस्टला महसूल सप्ताहास सुरवात होणार असून यादिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी6 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचातर 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवादउत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु