ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबवायचा मतदार यादी कार्यक्रम घोषित

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने

राबवायचा मतदार यादी कार्यक्रम घोषित

लातूर, दि. 02 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 28 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार पारंपारीक पद्धतीने राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्यानवनिर्मित व मागील निवडणुकांमध्‍ये चुकीची प्रभाग रचना झाल्‍यामुळे, तसेच बहिष्‍कार व इतर कारणांमुळे निवडणूका न होवू शकलेल्‍या सुमारे 1588 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच 31 मे 2024 पर्यंत निधनराजीनामाअनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य अथवा थेट सरपंच पदांच्या रिक्‍त झालेल्‍या जागांच्‍या पोटनिवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

मतदार यादी कार्यक्रमासाठी माहे एप्रिल-मे 2024 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणूक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी यापुढे होणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या सार्वत्रिक तथा पोटनिवडणुकांची मतदार यादी तयार करण्‍यासाठी वापरण्‍यात येईल, असे अधिसुचित करण्‍यात आले आहे. 9 जुलै 2024 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 9 जुलै ते 15 जुलै 2024 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु