जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार कडबाकुट्टी, स्लरी फिल्टर, बीज प्रक्रिया ड्रम आणि सोयाबीन टोकन यंत्र

 जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार

कडबाकुट्टी, स्लरी फिल्टर, बीज प्रक्रिया ड्रम आणि सोयाबीन टोकन यंत्र

लातूर, दि. 02 (जिमाका) :  जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी सयंत्रस्लरी फिल्टरबीज प्रक्रिया ड्रमसोयाबीन टोकन यंत्र अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यात येणार आहे. तसेच रब्बी हरभरा पीकासाठी जीवाणू संवर्धक संघतूर मररोग नियंत्रणासाठी बायोमिक्स एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2024 पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी आणि कृषि विकास अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जातीअनुसूचित जमातीअत्यल्पभूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील.

 

इच्छुक शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबाराआठ अआधारकार्डबँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, तसेच लाभार्थी अनुसूचित जातीअनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत. लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील. खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परिक्षण करुन ती बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसारतांत्रिक निकषानुसार असावीत. रब्बी हरभरा पीकासाठी जीवणू संवर्धक संघतूर मररोग नियंत्रणासाठी बायोमिक्स एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येईल व यांचा पुरवठा पंचायत समिती स्तरावरुन करण्यात येईल.

अवजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड संबंधित पंचायत समितीस्तरावर करण्यात येईल. मंजूर अवजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 31 जुलै2024 पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विकास अधिकारी श्री. बिडबाग यांनी केले आहे

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु