9 जुलै पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास ग्रामपंचायत सदस्य, सरपंचपद होणार रद्द

 

9 जुलै पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास ग्रामपंचायत सदस्य, सरपंचपद होणार रद्द

 

लातूर, दि. 05 (जिमाका) :  राज्य शासनाच्या 10 जुलै 2023 रोजीच्या अध्यादेशानुसार 1 जानेवारी, 2021 ते 10 जुलै, 2023 दरम्यान पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या, तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक पोट निवडणुकामध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत 9 जुलै, 2024 रोजी संपत आहे.

 

त्यामुळे 1 जानेवारी, 2021 ते दिनांक 30 जून 2023 या कालावधीत पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक. पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र 9 जुलै, 2024 रोजीपर्यंत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) नितीन वाघमारे यांनी केले आहे. बारा महिन्यांच्या मुदतवाढीच्या कालावधीत ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केले नाही, अशा उमेदवारांचे सदस्य, सरपंच पद भूतलक्षी प्रभावाने रद्द झाले असल्याचे मानण्यात येईल, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु