खेळाडूंना राज्याच्या विविध क्रीडा प्रबोधनीत प्रवेशाची संधी

 खेळाडूंना राज्याच्या विविध क्रीडा प्रबोधनीत प्रवेशाची संधी

लातूर, दि. 02 (जिमाका) : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणसुंतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. या प्रबोधनीमध्ये प्रवेश मिळविण्याची खेळाडूंना संधी मिळणार असून यासाठी 5 जुलै 2024 पर्यंत मूळ क्रीडा प्रमाणपत्रांसह जळ क्रीडा अधिकारी कार्यालयात नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2024-2025 साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत पुणे (म्हाळुंगे-बालेवाडी) कोल्हापूरठाणेअमरावतीनाशिकनागपूरछत्रपती संभाजीनगरगडचिरोली क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी 15 ते 16 जुलै2024 दरम्यान सरळ प्रवेश आणि कौशल्य चाचणी प्रक्रियेतंर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे. सरळ प्रवेशासाठी आर्चरीहॅण्डबॉलबॉक्सिंगकुस्तीबॅडमिंटनअनिवासीॲथलेटिक्सजलतरणशुटिंग,सायकलिंगहॉकीफुटबॉलज्युदोटेबल टेनिसवेटलिफ्टिंगजिम्नॅस्टिक्स या खेळांचा समावेश आहे. तर कौशल्य चाचणीमध्ये हॅण्डबॉलजलतरणसायकलिंगफुटबॉलजिम्नॅस्टिक्स खेळाचा समावेश राहील.

सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहेअशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देवून प्रवेश निश्चित केला जाईल.

खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षे आतील आहेअशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र असलेल्या खेळाडूंनी 5 जुलै2024 पर्यंत मूळ क्रीडा प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयलातूर येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे ( भ्रमणध्वनी क्र. 8275273917) आणि चंद्रकांत लोदगेकर (भ्रमणध्वनी क्र. 9834988239) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु