जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन • तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून महिलांना मार्गदर्शन

 जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन


तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून महिलांना मार्गदर्शन


लातूर, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेचा ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिरांमध्ये महिलांना या योजनेची माहिती देण्यासोबतच त्यांचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही केली जात आहे. तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्यासह संबंधित तालुकास्तरीय अधिकारीही या शिबिरांना भेटी देवून महिलांना मार्गदर्शन करीत आहेत.


‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतून अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असला तरी शिबिरांच्या माध्यमातून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्वीकारून हे अर्ज ऑनलाईन केले जात आहे. या शिबिराच्या ठिकाणी महिलांना योजनेची माहिती देवून आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात अशा प्रकारची जवळपास 89 शिबिरे घेण्यात आली.


तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह विविध तालुकास्तरीय अधिकारी यांनी विविध शिबिरांना उपस्थित राहून महिलांना योजनेबाबत माहिती दिली. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून महिलांनी गर्दी न करता आपले अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले.

*** 





Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु