उदगीर येथील मत्स्यविज्ञान विद्यालयात बुधवारी कार्यशाळा

 उदगीर येथील मत्स्यविज्ञान विद्यालयात बुधवारी कार्यशाळा

लातूरदि. 08 (जिमाका) :  मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त आणि उदगीर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील मत्स्यशेतकरी, प्रशिक्षण घेण्यास इच्छुकांसाठी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून 10 जून, 2024 रोजी सकाळी 10 वाजता उदगीर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय तज्ज्ञांमार्फत आधुनिक व पारंपारिक मत्स्यसंवर्धन या विषयावर निशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त प्रशिक्षनार्थीनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त तेजस्विनी करळे यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु