विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत 29 जुलै रोजी दयानंद सभागृह येथे बैठकीचे आयोजन

 विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत

29 जुलै रोजी दयानंद सभागृह येथे बैठकीचे आयोजन

लातूरदि. 11 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी सन 2024-2025 या वर्षात 95 खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजनास मान्यता दिली आहे. या स्पर्धा आयेाजन व नियोजनासाठी लातूर जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व क्रीडा विभागाचा कार्यभार असलेल्या शिक्षकांची बैठक 29 जुलै 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु