मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीं महिलांनी अधिवास, उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज करावेत

                                                      मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना

लाभार्थीं महिलांनी अधिवासउत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी

महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज करावेत

·         लाभार्थ्यांनी कोणत्याही मध्यस्थांची मदत घेण्याची आवश्यकता नाही

·         योजनेची माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष कार्यान्वित

·         हमीपत्रासाठी स्टँपची आवश्यकता नाहीसाध्या कागदावरील स्वयंघोषणापत्र ग्राह्य

लातूर, दि. 02 (जिमाका) : महिलामुलीना स्वावलंबीआत्मनिर्भर बनविणे आणि त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीणयोजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहितविधवाघटस्फोटीतपरित्यक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा 1500 रुपये सहाय्य केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लाभार्थी महिलांनी कोणत्याही मध्यस्थापासून सावध रहावेअशा व्यक्तींची माहिती जिल्हास्तरीय मदत कक्षाला द्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

या अर्जासोबत जोडण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून असे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रातून अर्ज करावेत. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणाकडून पैशाची मागणी होत असल्यास अशा व्यक्तीची माहिती जिल्हास्तरीय मदत कक्षाला द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र महिला वंचित राहणार नाहीतयाची दक्षता जिल्हा प्रशासनामार्फत घेतली जात आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2024 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. योजनेचे अर्ज पोर्टलआपले सरकार सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच लाभार्थी स्वतः मोबाईल ॲपद्वारे आपले अर्ज ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेलत्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रातबाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरीग्रामीणआदिवासी) ग्रामपंचायतवार्डआपले सरकार सेवा केंद्र येथे उपलब्ध असतील. योजनेचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. यासाठी अर्जदार महिलेने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. अर्ज भरताना कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)स्वतःचे आधार कार्ड सोबत आणावे.

यांना मिळेल योजनेचा लाभ

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहितविधवाघटस्फोटीतपरितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत. वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत याचा लाभ मिळू शकतो. योजनेसाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावेअशा कुटुंबातील व्यक्ती लाभार्थी होऊ शकते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्डअधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात आलेले जन्म नोंदणी प्रमाणपत्रसक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखलाबँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतपासपोर्ट आकाराचा फोटोरेशन कार्डअटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. या योजनेसाठी स्टँप पेपरची आवश्यकता नाही. केवळ साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

योजनेबाबत मार्गदर्शनासाठी जिल्हा स्तरावर मदत कक्ष

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठीतसेच याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या 7972500326 आणि 02382-299680 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीत किंवा sakhiosclatur@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु