शेतकरी गटांनी विविध बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शेतकरी गटांनी विविध बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 02 (जिमाका) : अन्न व  पोषण सुरक्षा सन 2024-2025 अंतर्गत अन्नधान्य पिके फ्लेक्झी घटक या घटकांतर्गत शेतकरी गटांकडून विविध बाबींसाठी तालुकास्तरावर 16 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

अन्नधान्य साठवणुकीकरिता 250 मे. टन क्षमतेसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या गोदाम बांधकामासाठी 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान राहील.  ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जावर (शेतकरी उत्पादक संघकंपनीएफपीएफपीसी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडार योजनानाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँककडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.

उत्पादित बियाणावर प्रक्रिया करुन दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ कंपनी यांना बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्रसामुग्री व बांधकामासाठी ) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेलते अनुदान अनुज्ञेय आहे. बियाण्यास मोठ्या प्रमाणावर बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बीज प्रक्रिया ड्रमयंत्र खरेदीसाठी हजार रुपये प्रति युनिट किंवा किंमतीच्या 50 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.

या सर्व बाबींसाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनीएफपीओएफपीसी यांनी संबंधित तालुकास्तरावर ऑफलाईन पध्दतीने 16 जुलै, 2024 पर्यंत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.

******

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु