कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 04 (जिमाका) : राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्याकृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा, तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्तीसंस्थागट यांना विविध पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारवसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारजिजामाता कृषिभूषण पुरस्कारसेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कारउद्यानपंडीत पुरस्कारवसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारयुवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारीकर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्त्न आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तीगटसंस्था यांचे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरीगटसंस्थाव्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु