लातूर जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन

 लातूर जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांना

राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन

लातूरदि. 26 : सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी 2013 मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे.

आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्यवर्धिनी केंद्रातंर्गत एनक्यूएएसची विस्तृतपणे आठ विभागातंर्गत तपासणी केली जाते. सेवा तरतूदरुग्णांचे हक्कइनपुटसहाय्य सेवाक्लिनिकल केअरसंक्रमण नियंत्रणगुणवत्ता व्यवस्थापन आणि परिणाम इत्यादीबाबत सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारणे, तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातंर्गत गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये घ्यावयाची काळजीनवजात आणि अर्भक आरोग्य सेवाबालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवाकुटूंब कल्याणसंसर्गजन्य  रोग व्यवस्थापनकिरकोळ घटकांसह साध्या आजाराचे व्यवस्थापनअसंसर्गजन्या रोग व्यवस्थापनसामान्य नेत्ररोग आणि काननाकघसा काळजीमुख आरोग्य काळजीवृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवाआपत्कालीन वैद्यकीय सेवामानसिक आरोग्याच्या आजारांचे व्यवस्थापन आदी सेवांबाबत दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे केंद्रस्तरावरुन एनक्यूएएस बाह्य मुल्यांकन कर्त्यामार्फत पाहणी करण्यात आली.

उदगीर तालुक्यातील किणी यल्लादेवी, तोंडचीर, तोंडार, अवलकोंडा, लातूर तालुक्यातील पाखर सांगवी, अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा, औसा तालुक्यातील सारोळा, जळकोट तालुक्यातील घोणशी या आठ आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन आरोग्य विभागातील सर्वोच्च दर्जाचे मानांकन असून आरोग्यवर्धिनी केंद्राना सलग तीन वर्षे 12 सेवांसाठी प्रत्येकी 18 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 16 हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. एन. डी. बोडके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. सी. पंडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बरुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. कापसे, जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पी. ए. रेड्डी यांनी मार्गदर्शन व तयारी केली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु