पोस्ट ऑफिसमध्ये लेक लाडकी योजनेसाठी बँक खाते उघडण्याची सुविधा

  

पोस्ट ऑफिसमध्ये लेक लाडकी योजनेसाठी

बँक खाते उघडण्याची सुविधा

 लातूरदि.15 (जिमाका) : लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची विशेष योजना आहेज्यामुळे मुलींना शिक्षणातसामाजिक सुरक्षा आणि स्वावलंबनासाठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये थेट लाभार्थी हस्तांतरण (डिबीटी) द्वारे रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. पोस्ट ऑफिसमध्ये लाभार्थीचे मातेसोबत संयुक्त खाते उघडून त्यांला आधारसंलग्न करून देण्याची सुवधिा उपलब्ध आहे.

तसेच पोस्ट ऑफिसच्या खात्याला आयएफएससी कोड देखील उपलब्ध आहेजेणेकरुन जी आर्थिक लाभाची रक्कम सरकारतर्फे सुनिश्चित करण्यात आली आहेती आपल्या खात्यामध्ये जमा होवू शकते. बचत खाते अवयस्क मुलींसाठी संयुक्तपणे आईसोबत उघडले जाऊ शकते. असे खाते सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. खात्यासाठी 4 टक्के व्याजदर देण्यात येईल. खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र व आधारकार्ड, तसेच आईचे पॅनकार्ड व आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. खाते किमान 500 रुपये रक्कमेने उघडले जाऊ शकते. तसेच हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही स्थानांतरीत करता येवू शकते. या खात्यामध्ये इतर बचतीचे व्यवहार (रक्कम काढणे अथवाभरणे) करता येवू शकतात.

तरी आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचे लाभार्थी व्हावे आणि आपल्या मुलीचे भवितव्य सुरक्षित आणि स्वावलंबी करावे, असे आवाहन धाराशिव विभागाचे डाक अधीक्षक संजय एन. अंबेकर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु