बालविवाह निर्मुलनासाठी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये होणार जनजागृती

 बालविवाह निर्मुलनासाठी जिल्ह्यातील

निवडक शाळांमध्ये होणार जनजागृती

लातूरदि. 09 (जिमाका) : उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे नुकतीच झाली. जिल्ह्यातील निवडक 125 शाळांमध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये बालविवाह निर्मूलनविषयक जनजागृती सत्र आयोजित करण्याचे नियोजन यामध्ये करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावेजिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळेसहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटीलशिक्षण विभागाचे डी. के. हैबतपुरे, एम. जे. ढमालेबाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. एच. निपाणीकरपरीविक्षा अधिकारी धनंजय जावळगेआयसीडीएस पर्यवेक्षक ए. बी. सूर्यवंशीअॅड. छाया माळवडे आणि अॅड. छाया आकाटे (बाल न्याय मंडळ)वरिष्ठ प्रकल्प समन्वयक श्री. कांबळेसिद्धराम गायकवाड आणि सहाय्यक प्रकल्प समन्वयक श्रुती वाघमोडे यांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्ह्यातील निवडक 125 शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये बालविवाह निर्मूलनविषयक जनजागृती सत्र महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने, युनिसेफ आणि सेंट्रल फॉर सोशल ॲन्ड बिहेव्हीअर कम्युनिकेशन (एसबीसी-3) यांच्या आर्थिक सहकार्याने कलापंढरी संस्थेने नियुक्त केलेल्या 40 स्वयंसेविका यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्प लाईनचे बापू सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु