सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृहांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या

वसतिगृहांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींचे 12 अशी एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hostel.mahasamajkalyan.in/  या लिंकचा वापर करुन विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रकरिक्त जागेचा तपशिलप्रवेशासाठी नियमअटी व शर्ती यांची माहिती घेवून अर्ज भरु शकतात.

जिल्ह्यात इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच बिगर व्यावसायीक पदवीपदविका प्रथम वर्षातपदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचे प्रवेश अर्ज भरता येतील. थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिअग्र व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल. तरी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://hostel.mahasamajkalyan.in/ या लिंक चा वापर करुन तसेच स्थानिक गृहप्रमुखगृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेतअसे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु