क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूर दि. 30 : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे बुधवार, 31 जुलै 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 31 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता लातूर येथून मोटारीने बिदर जिल्ह्यातील भालकीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.31 वाजता भालकी येथील सन्मुखअप्पा कल्याण मंडप येथे रामेश्वर प्रभूअप्पा निटूरे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता भालकी येथून जळकोटकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित पूज्य कुमार स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य चंद्रकांत मारुती कांबळे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता जळकोट येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील.

ना. बनसोडे हे सायंकाळी 5 वाजता उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील श्री बाबुराव पांचाळ यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 6 वाजता उदगीर शहरातील सराफा लाईन रोडवरील शंकरअप्पा मठ येथे उदगीर विश्व हिंदू परिषदद्वारा आयोजित गुरु पूजन व धर्मरक्षा निधी उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 7 वाजता उदगीर तालुक्यातील हेर येथील श्री पद्माकर कांबळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. त्यानंतर सोयीनुसार उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील व शकुंतला निवासस्थान येथे राखीव.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु