मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावेत

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी

ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावेत

लातूरदि. 15 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरीकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित गावाचे ग्रामसेवक यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या वयोमानपरत्वे येणारे अपंगत्वअशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक चष्माश्रवणयंत्रट्रायपॉडस्टिकव्हील चेअरफोल्डींग वॉकर कमोड खुर्ची नि-ब्रेसलंबर बेल्टसर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्य साधनेउपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मन:स्वास्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये सहाय देण्यात येणार आहे. ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (डिबीटी) प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जपासपोर्ट आकाराचे दोन फोटोआधारकार्ड व मतदान ओळखपत्राची छायांकित प्रतराष्ट्रीयकृत बँक पासबुकची छायांकित प्रतउत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्रशासनाच्या इतर योजनेमधून लाभ घेतला नसल्याचे स्वंयघोषणापत्र सादर करावे. ही योजना लातूर जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्याची प्रक्रिया सुरु असून योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गावच्या संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे उपलब्ध करुन दिलेल्या विहीत अर्जाच्या नमुन्यात आवश्यक माहिती भरुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु