बायोगॅस संयंत्रासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 बायोगॅस संयंत्रासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूरदि. 23 :  नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम (एनएनबीसीएमपी) अंतर्गत 2024-25 या वर्षासाठी शासनाकडून बायोगॅस संयंत्रचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. या अंतर्गत 2-4 घ.मी.च्या बायोगॅस उभारणीसाठी 14 हजार 350 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तरी बायोगॅस घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वसाधारणअनुसूचित जातीअनुसूचित जमाती या प्रवर्गातील बायोगॅस घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी सातबाराआठ अजनावरे असल्याचे प्रमाणपत्रबँक पासबुकआधारकार्डजातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह आपले अर्ज संबंधित पंचायत समिती कार्यालयामध्ये 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेतअसे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मिलींद बिडबाग यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु