साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी

25 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 16 (जिमाका) :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत दरवर्षी इयत्ता दहावी, बारावी,पदवीपदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी व विद्यार्थींनींना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महामंडळामार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

सन 2023-24 या वित्तीय आर्थिक वर्षामध्ये इयत्ता दहावी, बारावी,पदवीपदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थींनींकडून प्रथम 03 ते 05 विद्यार्थी व विद्यार्थींनींना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थींनींनाकडून शिष्यवृत्ती मागणीचे अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष जिल्हा कार्यालयामध्ये शिष्यवृत्ती मागणी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 आहे. या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तरी लातूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थींनींनी शिष्यवृत्ती अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे, गुणपत्रके व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या इतर पुराव्यासह अर्ज सादर करावेत, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु