आर्थिक मदतीची प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्डाकडे ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन

 आर्थिक मदतीची प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्डाकडे

ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन

लातूरदि. 08 (जिमाका) : हवालदारपर्यंतच्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय सैनिक बोर्डामार्फत शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात येते. ही मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केंद्रीय सैनिक बोर्डाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चरितार्थासाठी आर्थिक मदत योजनेंतर्गत 1 एप्रिल रेाजी 65 वर्षे वय आणि पेंशन नसलेले माजी सैनिक व विधवासाठी 48 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत देण्यात येते. सन 2024-2025 मध्ये आरंभीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च2025 असून सन 2024-2025 नुतणीकरणासाठी  अंतिम तारीख 1 डिसेंबर2024 ते 31 मार्च2025 आहे.

पहिल्या व दुसऱ्या पाल्यास प्रत्येकी 12 हजार रुपये शिक्षणाची आर्थिक मदत (शैक्षणिक वर्ष 2023-2024 करिता) योजनेसाठी इयत्ता पहिली ते दहावी, अकरावी आणि बारावीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर2024 पर्यंत आहे. बी.ए.बी.कॉमबीएससी पदवीधर (व्यावसायिक शिक्षण व्यतिरिक्त)साठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर2024 पर्यंत आहे.

मुलीच्या लग्नाची आर्थिक मदत योजनेतून एका मुलीच्या लग्नासाठी 50 हजार रुपये दिले जातात. यासाठी लग्नानंतर 180 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच अनाथ मुलासाठी वार्षिक 12 हजार रुपये मदत दिली जाते. अंतिम पालकाच्या मृत्यूनंतर या लाभास प्रारंभ होतो. या योजनेच्या सन 2023-24 (नूतनीकरणासाठी) अंतिम तारीख 1 डिसेंबर2024 ते 31 मार्च2025 पर्यंत आहे. 100 टक्के मतिमंददिव्यांग पाल्यांसाठी आर्थिक मदत वार्षिक 12 हजार रुपये मदत केली जाते. या योजनेच्या आरंभासाठी मुदत नाही. सन 2023-2024 मधील नूतनीकरणासाठी 1 डिसेंबर2024 ते दिनांक 31 मार्च2025 पर्यंत अर्ज करावेत. 30 हजार रुपये पर्यंत वैद्यकीय मदत आणि गंभीर आजारासाठी 1 लाख 25 हजार रुपयेपर्यंत मदत देण्यात येते. यासाठी हॉस्पिटलामधून डिस्चार्ज झाल्याच्या तारखेपासून 180 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

गतिशिलता उपकरणासाठी अर्ज करण्याची मुदत नाही. गृह कर्जावर सबसिडीसाठी बँकेकडून कर्ज मंजूर झालेल्या तारखेपासून 180 दिवसाच्या आत अर्ज करावेतल. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मदत मिळविण्यासाठी व्यावसायिक कोर्स पूर्ण झाल्याच्या तारखेपासून 180 दिवसाच्या आत अर्ज करावेत.  तसेच माजी सैनिकांनी त्यांचे डिस्चार्ज पुस्तक व पाल्यांचे गुणपत्रकांच्या आधार आवेदन हे बिनचूक सादर करणे अनिवार्य राहील. तरी पात्र इच्छूक माजी सैनिकांच्या पाल्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल पांढरे (नि) यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु