‘लातूर हरितोत्सव 2024’ मध्ये सवलतीच्या दरात मिळणार रोपे

 ‘लातूर हरितोत्सव 2024’ मध्ये सवलतीच्या दरात मिळणार रोपे

·         जिल्हा प्रश्सानाच्यावतीने गंजगोलाई परिसरात रविवारी आयोजन

·         एकाच ठिकाणी मिळणार औषधी वनस्पती, फुलझाडे, फळझाडांची रोपे

·         आतापर्यंत 27 खासगी रोपवाटिकांनी केली नावनोंदणी

लातूरदि. 03 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाच्यावतीने राववार, 7 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात ‘लातूर हरितोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेला चालना देण्यासाठी एकाच ठिकाणी विविध प्रजातीच्या वृक्षांची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे आणि वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गंजगोलाई परिसरात होणाऱ्या या उपक्रमात खासगी रोपवाटिकांचे स्टॉल लावण्यात येणार असून यासाठी 27 रोपवाटिकांनी नोंदणी केली आहे. यासोबतच शासकीय रोपवाटिकांचे स्टॉलही याठिकाणी राहणार आहेत.

जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझं लातूरहरित लातूर’ अभियानांतर्गत 7 जुलै रोजी गंजगोलाई परिसरात ‘लातूर हरितोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना घराच्या अंगणातटेरेसवर कोणत्या वृक्षांची लागवड करावीत्याचे संवर्धन कसे करावेयाबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच विविध रोपवाटिकांच्या सहाय्याने सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यामध्ये औषधी वनस्पती, शोभेची झाडे, परसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडे, फळझाडे व फुलझाडांची रोपेवृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खतेकुंड्या व इतर आवश्यक साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच आपल्या घराच्या अंगणातटेरेसवर किंवा शेताच्या बांधावर वृक्षारोपण आणि संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांची नोंदणी करण्यात येत असून आतापर्यंत 27 खासगी रोपवाटिकांनी नाव नोंदणी केली आहे. गंजगोलाई परिसरात रस्त्याच्या दुतर्फा विविध शासकीय आणि खासगी रोपवाटिकांचे विविध रोपांचे प्रदर्शन व सवलतीच्या दरात विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहे.

महिला बचतगटांचे ‘मिलेट फूड’ स्टॉल

जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असून आरोग्यासाठी हितकारक असलेल्या पौष्टिक तृणधान्यांपासून अर्थात मिलेटपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची चव चाखण्याची संधी ‘लातूर हरितोत्सव 2024’च्या निमित्ताने मिळणार आहे. यासाठी महिला बचतगटांचे विविध स्टॉल 7 जुलै रोजी गंजगोलाई परिसरात लावले जाणार आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु