परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

 परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी

अर्ज करण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

लातूर, दि. 01 (जिमाका) : राज्यातील विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2024-25 साठी 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी 5 जून 2024 रोजी इतर मागास बहुजन कल्‍याण संचालनालयामार्फत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 30 जून 2024 पर्यंत देण्यात आली होती. या योजनेस मिळालेला प्रतिसाद विचारात घेता 15 दिवसांची म्हणजेच 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी परदेशात शिक्षण घेत असलेल्‍या इच्‍छुक विद्यार्थ्‍यांनी विहीत मुदतीत इतर मागास बहुजन कल्‍याण संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य पुणे येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन  संचालकइतर मागास बहुजन कल्‍याणमहाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु