भटक्‍या जमाती (क) प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजनेतून सहाय्य

 भटक्‍या जमाती (क) प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजनेतून सहाय्य

·       15 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 01 (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत भटक्‍या जमाती (क) प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्‍या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 15 जुलै 2024 पर्यंत सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्‍याण कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत. या कार्यालयात अर्जाचा नमुना विनाशुल्‍क उपलब्‍ध आहे, असे इतर मगास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवकांत चिकुर्ते यांनी कळविले आहे.

या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. भोजननिवास व निर्वाह भत्‍ता यासाठी महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 43 हजार रुपये व तालुक्‍याच्‍या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्‍यात थेट रक्‍कम वितरीत करण्‍यात येणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी इतर मागास बहुजन कल्‍याण कार्यालयातील एम. बी. बोडके (भ्रमणध्वनी क्र. 9970198034) यांच्याशी संपर्क साधावा.

अशा आहेत योजनेच्या अटी

विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा आणि महाराष्‍ट्रचा रहिवाशी असावा. विद्यार्थ्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असणे अवश्‍यक आहे. तसेच विद्यार्थ्‍याच्या पालकाचे उत्‍पन्‍न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्‍त नसावे. विद्यार्थ्‍याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्‍था ज्या शहराच्‍या अथवा तालुक्‍याच्‍या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावीनंतरचे उच्‍च शिक्षण घेत असावा आणि त्याला इयतबारावीमध्ये 60 टक्‍केपेक्षा जास्‍त गुण असणे आवश्यक आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु