शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांचे 5 ते 20 जुलै दरम्यान होणार सर्वेक्षण

 शाळाबाह्यअनियमित आणि स्थलांतरित बालकांचे

5 ते 20 जुलै दरम्यान होणार सर्वेक्षण

लातूरदि. 04 (जिमाका) : शाळाबाह्यअनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेण्यासाठी 5 ते 20 जुलै 2024 या कालावधीमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविणाय येत आहे. 2 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित जिल्हास्तर बैठकीत                      उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत  सर्वेक्षणाची  प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना तथा मार्गादर्शन करण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे यांनी सर्व गट शिक्षणाधिकारीसर्व  विस्तार अधिकारीसर्व केंद्रप्रमुखसर्व बालरक्षकसर्वसाधन व्यक्तीसमावेशित शिक्षण विषय तज्ज्ञसर्व  मुख्याध्यापक  (सर्व  व्यस्थापन)सर्व शिक्षक (सर्व  व्यस्थापन )सर्व अंगणवाडी मदतनीस ताईसर्व शाळा व्यस्थापन समिती सदस्यअंगणवाडी सेविकाशिक्षिकाआरोग्य सेवक यांनी शाळाबाह्यअनियमित व स्थलांतरित बालकांची सर्वेक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे .

तसेच शाळाबाह्यअनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण मोहीम अंतर्गत  विहित  प्रपत्रे (अड)  संकलित  माहिती  समग्र शिक्षा विभाग जिल्हा परिषदेद्वारे दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये संबंधित मुख्याध्यपकाने सांख्यिकी माहिती संकलित करावी. तसेच सर्वेक्षणाबाबतची माहिती सॉफ्ट कॉपी एक्सेलशीटमध्ये व हार्ड कॉपी विद्यार्थीनिहाय संकलित माहिती  22 जुलै2024 रोजी लातूर जिल्हा परिषद समग्र शिक्षा विभाग येथे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु