शासकीय योजनांच्या माध्यमातून वाडी, तांड्यापर्यंत सुविधा निर्मिती -क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 उदगीर येथे कै. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

शासकीय योजनांच्या माध्यमातून वाडी, तांड्यापर्यंत सुविधा निर्मिती

-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

·         बंजारा समाजासाठी उदगीर शहरात संत सेवालाल भवन उभारण्याबाबत लवकरच निर्णय

लातूर, दि. 01 (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उदगीरजळकोट तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली. सर्व समाज घटकांच्या विकासाला यामाध्यमातून प्राधान्य दिले. तालुक्यातील वाडीतांड्यापर्यंत विविध सुविधा निर्मिती करण्यासोबतच रस्ते विकासासाठी प्रयत्न केल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या कै. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. माजी आमदार गोविंद केंद्रेमनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक सुशांत शिंदेतहसीलदार राम बोरगावकरपनवेल महानगरपालिका उपायुक्त भारत राठोडउदगीर नगरपरिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदरगट विकास अधिकारी प्रवीण सुरडकरमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रेलातूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक लक्ष्मी भोसले यावेळी उपस्थित होत्या.

हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्राच्या विकासासाठी आणि पर्यायाने राज्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. तब्बल अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना सर्वांना सोबत घेवून महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या. त्यांनी केलेले काम आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच उदगीर शहरात कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळा उभारणीचा प्रलंबित विषय निकाली निघाल्यानंतर गतवर्षी 1 जुलै रोजी पुतळा उभारणी कामाचे आपण भूमिपूजन केले. एका वर्षात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आणि त्याचे आज अनावरण होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बंजारा समाजासाठी संत सेवालाल भवन उभारण्याची ग्वावी संत सेवालाल जयंतीदिनी आपण दिली होती. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी सर्वांच्या सहमतीने जागा निश्चित करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईलअसे ना. बनसोडे म्हणाले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बंजारा तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. तसेच तांड्यावर पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. उदगीर शहराला सुंदर आणि हरित बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरात विविध शासकीय इमारतींचे भूमिपूजन होणार असल्याचे ते म्हणाले.

संजय राठोड, प्रकाश राठोड, भारत राठोड, कल्याण पाटील, शिवाजी मुळे, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार श्री. पटवारी, माजी आमदार श्री. केंद्रे, माजी नगराध्यक्ष श्री. निटूरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब राठोड यांनी केले.

*****






Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु