संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

लातूरदि. 16 (जिमाका): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान व बिज भांडवल योजना राबविली जाते. महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयास 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यातील चांभारमोचीढोर व होलार समाजातील बेरोजगार युवक व युवती तसेच होतकरुगरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. टी. जिभकाटे यांनी केले आहे.

महामंडळाच्या अनुदान योजनेतून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 50 हजार रुपयांपर्यत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसासायाठी अर्थसहाय्य दिले जाते. 50 हजार ते रुपये 5 लाख रुपयेपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बिजभांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्जपुरवठा सवलतीच्या व्याजदराने पुरविण्यात येतो. या योजनेतंर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. 5 टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वत:चा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. या व्यतिरिक्त महामंडळाकडून मुदती कर्ज योनालघुऋण वित्त योजनामहिला समृध्दी योजनामहिला अधिकारिता योजना व शैक्षणिक कर्ज योजना सुरु आहेत.

मुदती कर्ज योजनेतून 1 लाख रुपयेपासून ते 5 लाख रुपयेपर्यंतलघुऋण आणि महिला समृद्धी योजनेतून 50 हजार रुपये व 1 लाख 40 रुपयेपर्यंत, महिला अधिकारिता योजनेतून 5 लाख रुपयेशैक्षणिक कर्ज योजनेतून देशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 30 लाख रुपये, तर परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 40 लाख रुपयेपर्यंत कर्ज अशा 5 योजना 2024-2025 मध्ये सुरु आहेत. प्रकल्प रक्कम 5 लाख रुपये असलेल्या प्रकल्पांसाठी 50 हजार रुपये अनुदान तर प्रकल्प रक्कम 1 लाख 40 रुपये असणाऱ्या प्रकल्पांसाठी 31 हजार रुपये अनुदान दिले जाते.

बँकेमार्फत तसेच महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी चांभार समाजात अंतर्भात असणाऱ्या चांभारमोचीढोर व होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेवू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत महामंडळाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजुनी डाल्डा फॅक्ट्रीशिवनेरी गेटसमोरलातूर येथील जिल्हा कार्यालयात सादर करावेत.

सन 2024-2025 वर्षासाठी प्राप्त उद्दिष्ट

एनएफडीसी दीर्घ मुदती कर्ज योजना जुनी- 40एनएफडीसी दीर्घ मुदती कर्ज योजना नवीन- 02मायक्रो सूक्ष्म पत पुरवठा योजना जुनी- 18मायक्रो सूक्ष्म पत पुरवठा योजना नवीन- 10एमएसवाय महिला समृध्दी योजना जुनी- 20एमएसवाय महिला समृध्दी योजना नवीन- 10ईडीयु शैक्षणिक कर्ज योजना- 10महिला अधिकारिता योजना- 02विशेष घटक योजना- 25बिजभांडवल योजना- 16 असे एकूण 153 प्रकरणांचे उद्दिष्ट आहे.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

यापूर्वी लाभार्थ्याने अनुदानाचा लाभ घेतला नसावा. जातीचा दाखलाउत्पनाचा दाखलाआधारकार्डमतदार कार्डपॅनकार्डपासपोर्ट (फोटो)रेशनकार्डउद्योग अधारगुमास्ता (लायसन्स)ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्रशाळा सोडल्याचा दाखलारहिवासी दाखलाज्याठिकाणी व्यवसाय सुरु आहे किंवा व्यवसाय सुरु करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा. (उदा-अ  चा नमुना)कर पावतीजागेची रजिस्ट्रीभाडे करारनामाबँक पासबुकची झेरॉक्समहिलांसाठी लग्नाच्या पूर्वीचे जातीचे प्रमाणपत्र असल्यास शपथपत्रराजपत्रविवाह प्रमाणपत्रसंबंधित व्यवसायाचे जीएसटी कोटेशनप्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल), यापूर्वी अनुदान न घेतल्याचे शपथपत्रनामांकन शपथपत्र (वारसदार) स्वाक्षरीसहजामीनदाराचे शपथपत्रत्याचे आधारकार्डत्याचे नोकरीचे ओळखपत्रकार्यालयाचे हमीपत्रशेतकरी असल्यास सातबाराचा उतारा त्यावर बोझा चढविणे आवश्यकप्रॉपर्टी असल्यास प्रॉपर्टीचे कागदपत्रसर्व झेरॉक्स प्रती अर्जदाराने स्वत: साक्षांकित कराव्यातअर्जासाहित कागदपत्राचे तीन प्रतीमध्ये सादर कराव्यात. 2 लाख रुपये व त्यापुढील कर्जास सिबील स्कोर 500 अंकापेक्षा अधिक असावा. 50 हजारपर्यंत जीएसटी दरपत्रकात सूट.

50 हजार ते 2 लाख रुपयेपर्यंतच्या कर्ज प्रस्तावास एक जामीनदार (स्वत:ची जमीन अथवा अन्य एक शासकीय नोकरदारसातबारा व नमुना आठ यापैकी एक)2 लाख रुपयेच्या पुढील कर्जास कमीत कमी दोन जामीनदार आवश्यक आहेत यापैकी एक स्वत:चा जामिन ग्राह्य धरावा व दुसरा जामीनदार शेतकरीनोकरदारनमुदा क्र. 8 आवश्यक आहेअसे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जिभकाटे यांनी कळविले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु