‘नाफेड’मार्फत होणार आधारभूत दराने खरेदी; शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन

 ‘नाफेड’मार्फत होणार आधारभूत दराने खरेदी;

शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन

·         मका, तूर, चना, मूग, उडीद व सोयाबीनचा समावेश

लातूरदि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे 2024-25 हंगामातही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मकातूरचनामूगउडीदव सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाफेड कार्यालयाने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी  (eSamriddhi) पोर्टल सुरू केले आहे. ‘नाफेड’मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करावी. राज्यातील शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर पूर्वनोंदणी करावी आणि केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे. ई-समृद्धी पोर्टलवरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी विलास मारुतीराव सोमारे (भ्रमणध्वनी क्र. 8108182950)एमईएमएल कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीधर कानडे (भ्रमणध्वनी क्र. 9561717175) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु