जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी

प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 26 : येथील जवाहर नवोदय विद्यालयात 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत प्रवेशाकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज 16 सप्टेंबर 2024 पर्यंत भरता येणार आहेत. प्रवेश परीक्षा 18 जानेवारी2025 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, याकरिता प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. इंटरनेटवर ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज https://cbseitms.rcil.gov.in/nvs किंवा https://navodaya.gov.in या संकेतस्थळावरून भरावेत. या प्रमाणपत्रावर इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सही शिक्कापालकांची सहीविद्यार्थ्यांची सही व फोटो असणे आवश्यक आहे.

इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेस बसणारा विद्यार्थी इयत्ता तिसरीचौथीमध्ये सलगपणे उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीमध्ये लातूर जिल्ह्यात शिकत असावा. त्याचा जन्म 1 मे2013 ते 30 जुलै2015 (दोन्ही दिवस पकडून) दरम्यानचा असावा. त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत, अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर2024 असून  शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईवर तणाव येत असल्याने पालकांनी आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरावेत. प्रवेश परीक्षा 18 जानेवारी2025 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. इतर मागस (ओबीसी) प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च,2024 पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी फॉर्म नंबर 09) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याने अर्ज भरताना परीक्षेचे माध्यमवर्गशहरी-ग्रामीणमुलगा-मुलगी हे पर्याय खात्री केल्यानंतरच ऑनलाईन अर्ज जमा करावा.

अधिक माहितीसाठी लातूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अथवा आपल्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी किंवा जवळच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधावाअसे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु