शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी
स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल
यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत
n समाज कल्याण सहायक आयुक्त यांचे आवाहन
लातूर,दि.16(जिमाका)-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13
व मुलींचे 12 असे एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सदर वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2020 पासुन बंद करण्यात आलेली होती. सदर
शासकीय वसतिगृहे कोविड -19 बाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सुरू करण्यात अलेली
आहेत. या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरण्याकरिता दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे, तर व्यासायिक अभ्यासक्रमासाठी दि. 31 डिसेंबर, 2021 पर्यंत
अर्ज करता येणार आहेत.
जिल्ह्यात इ.आठवी ते अकरावी वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या
व पदवी प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना
प्रवेश दिला जाईल, तसेच जे विद्यार्थी सन 2020-2021 मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित होते,
त्यांना थेट 2021-2022 या वर्षात वसतिगृह प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. थेट
द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही 2020-2021 मध्ये वसतिगृह प्रवेशाची
संधी मिळाली नव्हती, अशा विद्यार्थ्यांपैकी तृतीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनाही
प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे.
तेंव्हा शासकीय
वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांचेकडे
प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एन.चिकुर्ते,
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
***
Comments
Post a Comment