Posts

Showing posts from 2023

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Image
मुंबई, दि. ३१ : प्रदूषण कमी करण्यासाठी  पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. *महास्वच्छता अभियान राज्यभर* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझ

उदगीर तालुक्यातील विविध विकासकामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण

Image
  सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध -         मंत्री रविंद्र चव्हाण   सर्व समाज घटकांना सोबत घेवून उदगीर तालुक्याच्या विकासाला गती - मंत्री संजय बनसोडे लातूर , दि. 30 ( जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून याकरिता विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. तर उदगीर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकासकामे सुरू असून यापुढेही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास कामांना गती देण्यात येईल , अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. उदगीर येथे तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये ना. चव्हाण व ना. बनसोडे बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे , महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे , अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख , माजी आमदार गोविंद केंद्रे , माजी आमदार सुधाकर भालेराव , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल

30 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान लातूर शहरात विशेष मतदार नोंदणी शिबीर

  30 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान लातूर   शहरात विशेष मतदार नोंदणी शिबीर   लातूर, दि. 29 (जिमाका):-    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने   विशेष मतदार नोंदणी   शिबीर   आयोजित करण्याबाबत   निवडणूक आयोगाचे आदेश प्राप्त झाले आहेत.   त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे   यांचा   मार्गदर्शनाखाली   30, 31 डिसेंबर, 2023 व 1 जानेवारी, 2024 रोजी   235-लातूर शहर मतदारसंघामध्ये   विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती   उपविभागीय अधिकारी तथा लातूर शहर मतदारसंघ -235 च्या मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांनी   दिली. भारत आयोगाच्या 29 मे, 2023 च्या पत्रान्वये   1 जानेवारी, 2024 या आर्हता दिनांक आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानुसार मतदार याद्यांची   अंतिम प्रसिध्दी 5 जानेवारी, 2024 रोजी होणार होती. या कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली असून मतदार यादी अंतिम प्रसिध्दीचा 5 जानेवारी, 2024 या ऐवजी  22 जानेवारी, 2024 असा करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने दि

लातूर शहर संजय गाधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 1 हजार 711 अर्जावर निर्णय

  लातूर शहर   संजय गाधी निराधार योजना समितीच्या बैठकीत   1 हजार 711 अर्जावर निर्णय लातूर, दि. 29 (जिमाका):-    संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहर अध्यक्ष शिवसिंह गोविंदसिंह सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली   जून 2023 ते डिसेंबर 2023 पर्यत प्रलंबित असलेल्या   1 हजार 711     संजय गांधी निराधार योजना अर्जावर   27 डिसेंबर, 2023 रोजी   लातूर   तहसील कार्यालय   येथे झालेल्या   बैठकीत    निर्णय घेण्यात आला. या बैठकीस लातूर तहसीलदार तथा समितीचे सदस्य सौदागर तांदळे, अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रमोद मधुकरराव गुडे, अॅड. विजयकुमार बब्रुवान आवचारे, दिपमाला जयराम तुपकर, कमलाकर नागोबा डोके, नरेश सोमनाथ   पंड्या, दशरथ मनोहर सलगर, कल्पनाताई शिवाप्पा बावगे, लताताई बब्रुवान घायाळ व   महानगरपालिका   आयुक्त   यांचे प्रतिनिधी   उपस्थित होते.   बैठक यशस्वी करण्यासाठी   तहसील कार्यालयातील नायब   तहसीलदार माडजे सविता, शिंदे नारायण मोहनराव, बिरादार सुप्रिया, बाळासाहेब जाधव,   हाशमी शेख यांनी परिश्रम घेतले. ****

पुणे येथे 9 जानेवारी रोजी माजी सैनिक मेळावा

  पुणे येथे 9 जानेवारी रोजी माजी सैनिक मेळावा   लातूर, दि. 29 (जिमाका):-    14 जानेवारी, 2024 या माजी सैनिक   दिनानिमित्त मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयामार्फत 9 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 9 पासून पुणे येथील ए.एफ.एम.सी. धन्वंतरी सभागृहात   माजी   सैनिक मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमाता, वीर पिता, विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबितांना नवीन   माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या तक्रारींचे सेना मुख्यालय, इ.सि.एच.एस., डब्ल्यू . एच.ओ, राज्य सैनिक बोर्ड, जिल्हा सैनिक बोर्ड , अभिलेख कार्यालय, सेना प्लेसमेंट नोड, पी.सी.डी.ए. (पेंशन), प्रयागराज येथील अधिकाऱ्यांमार्फत निवारण केले जाईल. सर्वाची नाष्टा व दुपारच्या जेवणाची सोय केली जाणार आहे, तरी सर्वांनी भारतीय पोषाख, शर्टच्या बरोबर टाई,   मुफ्ती पोषाख परिधान करुन उपस्थित रहावे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी   सर्व माजी सैनिक, वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबितांनी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपक्षेत्र हेल्पलाईन मोबाईल क्रमांक 8484094601 अथवा कर्नल व

शैक्षणिक वर्षे सन 2023-24 करिता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  शैक्षणिक वर्षे सन 2023-24 करिता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी   प्रस्ताव   सादर   करण्याचे आवाहन   लातूर, दि. 29 (जिमाका):-     जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयामार्फत   राबविण्यात येणाऱ्या   विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी   प्रस्ताव   सादर   करण्याचे आवाहन   जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार   नाईकवाडी यांनी केले आहे. यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे   आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.   भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायातील मुलांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना   लाभ देण्यात येतो. सन 2019-20 पासून इतर मागास प्रवर्ग व तसेच विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्त