विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'जेंडर सेन्सिटिव्हिटी' विषयावर विचारमंथन

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

'जेंडर सेन्सिटिव्हिटी' विषयावर विचारमंथन

           


लातूर, दि. 22 (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जिल्हाधिकारी  वर्षा ठाकूर-घूगे यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतेच जेंडर सेन्सिटिव्हिटी विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समिर जोशी, कॅनरा बँकेचे सहायक महाव्यवस्थापक विनय कुमार दास, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष तथा शरीरविकृतीशास्त्र विभाग विभागप्रमुख डॉ. उमेश कानडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी किशोरी मुंढे मुख्य यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता, डॉ. जोशी यांनी केले. त्यांनी 'जेंडर सेन्सिटिव्हिटी' च्या अनुषंगाने  काय बरोबर व काय चुक या वर्तनुकीबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी जेंडर रिस्पेक्ट यांचे महत्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी जेंडर संवेदनशिलतेची सामाजिक बाजु मांडली. तसेच जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक  डॉ. विमल होळंबे- डोळे यांनी व्हिडीओ व पीपीटी सादरीकरणातून जेंडर स्टेरीओ टायपिंग कंडीशन व जेंडर न्युट्रल पॅरेटींग, पालकांचा सहभाग या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाला वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थी, परिचर्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्व अध्यापक वर्ग उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा