‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत शुक्रवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत शुक्रवारी विविध
गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
लातूर, दि. 28 (जिमाका): केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी, 29 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
29 डिसेंबर, 2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी हिप्परगा का., वळसंगी, कोपरा व गुंजोटी, दुपारी सावरगाव रोकडा, मांडणी, धानोरा बु., सताळा, औसा तालुक्यात सकाळी माळकोंडजी, पारधेवाडी, दुपारी माळूंब्रा, मोगरगा, चाकूर तालुक्यात सकाळी सुगाव, दुपारी मुरंबी, लातूर तालुक्यात सकाळी करकट्टा, कृष्णनगर, खंडापूर, दुपारी बोरगांव बु, तांदुळवाडी, गातेगाव, रेणापूर तालुक्यात सकाळी मुरढव, दुपारी घनसरगाव, उदगीर तालुक्यात सकाळी चोंडी, दुपारी धडकनाळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
Comments
Post a Comment