मुद्रांक शुल्क व दंड सवलतीसाठी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

                                                            मुद्रांक शुल्क व दंड सवलतीसाठी 

अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन  

 

लातूर, दि. 27 (जिमाका):  शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना -2023 लागू केली आहे. ही योजना दोन टप्प्यामध्ये लागू असून पहिल्या टप्प्यात 1 जानेवारी, 1980 ते 31 डिसेंबर, 2000 या कालावधीतील नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तातील शासनास देय होणाऱ्या तथा वसुलीस पात्र संपूर्ण शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सवलत लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ पात्र व्यक्तींनी घेण्याचे आवाहन आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सं. श्री. देशमुख यांनी केले आहे.

या योजनेत पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर, 2023 ते 31 जानेवारी, 2024 पर्यंत दये होणारी मुद्रांक शुल्क रक्कम 1 लाखापर्यंत देय असलेल्या मुद्रांक शुल्क व दंड रक्कमेस माफी व 1 लाखाच्यावर देय असलेल्या मुद्रांक शुल्कात 50 टक्के व दंडाची संपूर्ण रक्कम सुट देण्यात आलेली आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कामध्ये 25 टक्के माफी दंडामध्ये 90 टक्के सुट देण्यात आलेली आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीच्यावर असल्यास त्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के सूट तसेच दंडाच्या रक्कमेत 1 कोटी दंड स्विकारुन उर्वरति दंडाच्या रक्कमेस सुट देण्यात आलेली आहे. दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवल 25 लाख दंड म्हणून स्वीकारण्यात येवून उर्वरित दंडाच्या रकमेत माफी असेल.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक 1 फेब्रुवारी, 2024 ते दिनांक 31 मार्च, 2024 या मर्यादित कालावधीसाठी कमी भरलेल्या मुद्रांक शुल्क रक्कमेवर 20 टक्के तसेच दंड रक्कमेमध्ये 80 टक्के माफी जाहीर केलेली आहे. या अभय योजना ही 1 जानेवारी, 2001 ते दिनांक 31 डिसेंबर, 2020 या कालावधीत निष्पादीत झालेल्या दस्तास लागू आहे.

ज्यांना मुद्रांक‍ शुल्क भरण्यासाठी नोटीस प्राप्‍त झालेली आहे. त्यांनी अभय योजना 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या अर्जासह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक‍ जिल्हाधिकारी, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर अथवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा