हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकानासाठी 4 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकानासाठी

4 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर, दि. 28 (जिमाका):  दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना लागू करण्यासं 10 जून, 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्या स्तरावरुन सुरु आहे. या योजनेसाठी 4 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा उद्देश आहे. योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना देण्यासाठी 3 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन नाव नोंदणीची कार्यवाही सुरु आहे. तरी इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी आपले अर्ज http://evehicleform.mshfdc.co.in या संकेतस्थळावर 4 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा