साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची परदेशात आणि देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना

                     साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची

परदेशात आणि देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना

लातूरदि. 12 (जिमाका):  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग व मातंग 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्यय करण्यात येते. यासाठी एन.एस.एफ.डी.सी. दिल्ली महामंडळामार्फत येत असलेली शैक्षणिक कर्ज योजना सन 2023-2024 पूर्ववत सुरु झाली आहे. विद्यार्थी व पालकांनी या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रमेश दरबस्तेवार यांनी केले आहे.

या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशातंर्गत शिक्षणासाठी 30 लाख  रुपये व परदेशातंर्गत शिक्षणासाठी रुपये 40 लाख रुपयेपर्यंत कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एनएसएफडीसीकडून उपलब्ध करुन देण्यात येतो. परदेशातंर्गत व विदेश शिक्षणासाठी रुपये 3 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

1 ऑक्टोबर2023 अन्वये देशातंर्गत शैक्षणिक कर्जासाठी रुपये व्याजदर आहे. महिला लाभार्थ्यांसाठी 5.5 व रुपये पुरुष लाभार्थीसाठी 6 टक्के व्याजदर आहे. तसेच विदेशी शैक्षणिक कर्जासाठी रुपये महिला लाभार्थीसाठी 6.5 टक्के व रुपये पुरुष लाभार्थीसाठी 7 टक्के व्याजदर असेल. रुपये 10 लाखापर्यंतचे कर्ज परतफेडीचा कालावधी 10 वर्षाचा असेल रुपये 10 लाखापेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा असेल. शिक्षण पुर्ण होवून 6 महिन्यांनी किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईलतेंव्हापासून परतफेडीचा सुरुवात होईल.

शैक्षणिक कर्ज अभ्यासक्रमाची यादी

अभियांत्रिकी (डिप्लोमाबी.टेक.बी.ई.एम.टेक.एम.ई)आर्किटेक्चर (बी. आर्कि.एम. आर्कि.)मेडिकल (एमबीबीएस/एमडी/एमएस)बायोटेक्नॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी/क्लिनिकल टेक्नॉलॉजी (डिप्लोमा/डिग्री)फार्मसी (बी. फार्म.एम. फार्म)डेंटल (बीडीएसएमडीएस)फिजिओथेरपी (बी.एस्सीएम.एस्सी),पॅथॉलॉजी (बी.एस्सीएम.एस्सी)नर्सिंग (बी.एस्सीएम.एस्सी) माहिती तंत्रज्ञान (बीसीएएमसीए)व्यवस्थापन (बीबीएएमबीए)हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटरिंग तंत्रज्ञान (पदवीपदव्युत्तर)विधी (एलएलबीएलएलएम)शिक्षण (सीटी,एनटीटी,बी.एड.एम.एड)शारीरिक शिक्षणपत्रकारिता आणि जनसंवाद (ग्रॅज्युएशनपोस्ट ग्रॅज्युएशन)जेरियाट्रिक केअर (डिप्लोमा तथा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा)मिडवाइफरी (डिप्लोमा)प्रयोगशाळा तंत्रज्ञ (डिप्लोमा)चार्टर्ड अकाउंटन्सीकॉस्ट अकाउंटन्सी (आयसीडब्ल्यूए)कंपनी सेक्रेटरीअॅकक्चुरिअल सायन्सेस (ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन/एफआयए)इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (एएमआयई) आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे सहयोगी सदस्यमान्यताप्राप्त संस्थेमध्ये एम.फिल/पीएचडी करण्यासाठी.

*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु