पुणे येथे 9 जानेवारी रोजी माजी सैनिक मेळावा

 

पुणे येथे 9 जानेवारी रोजी माजी सैनिक मेळावा

 

लातूर, दि. 29 (जिमाका):-  14 जानेवारी, 2024 या माजी सैनिक दिनानिमित्त मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयामार्फत 9 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 9 पासून पुणे येथील ए.एफ.एम.सी. धन्वंतरी सभागृहात माजी सैनिक मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमाता, वीर पिता, विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबितांना नवीन माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या तक्रारींचे सेना मुख्यालय, इ.सि.एच.एस., डब्ल्यू . एच.ओ, राज्य सैनिक बोर्ड, जिल्हा सैनिक बोर्ड , अभिलेख कार्यालय, सेना प्लेसमेंट नोड, पी.सी.डी.ए. (पेंशन), प्रयागराज येथील अधिकाऱ्यांमार्फत निवारण केले जाईल. सर्वाची नाष्टा व दुपारच्या जेवणाची सोय केली जाणार आहे, तरी सर्वांनी भारतीय पोषाख, शर्टच्या बरोबर टाई, मुफ्ती पोषाख परिधान करुन उपस्थित रहावे.

या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व माजी सैनिक, वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबितांनी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपक्षेत्र हेल्पलाईन मोबाईल क्रमांक 8484094601 अथवा कर्नल वेटरन, मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया मोबाईल क्रमांक  9545458913 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणींचे, तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु