ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना 6 डिसेंबरपर्यंत पारंपारिक पद्धतीने निवडणूक खर्च सादर करता येणार

 

ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना 6 डिसेंबरपर्यंत

पारंपारिक पद्धतीने निवडणूक खर्च सादर करता येणार

लातूर, दि. 05 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 3 ऑक्टोबर 2023 रोजीच्या निवडणूक कार्यक्रम आदेशानुसार जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी ट्रु व्होटर अॅपचा वापर करून 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च हिशोब सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, ज्या उमेदवारांना ट्रु व्होटर अॅप डाऊनलोड करणे शक्य नाही, अशा उमेदवारांना 6 डिसेंबर 2023 पर्यंत पारंपारिक पद्धतीने निवडणूक खर्च सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढविलेल्या बिनविरोध उमेदवारांसह सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यानात निवडणूक खर्च सादर करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु