युडीआयडीच्या ‘कोटी’ व्या क्रमांकामुळे लातूरच्या वंशिकाचा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिल्लीत गौरव

 

युडीआयडीच्या ‘कोटी’ व्या क्रमांकामुळे

लातूरच्या वंशिकाचा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिल्लीत गौरव

 



लातूर, दि. 12 (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा तसेच इतर लाभ मिळण्यासाठी दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र (युडीआयडी) केंद्र शासनाकडून देण्यात येते. त्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यतील हाळी या ग्रामीण भागातील शंभर टक्के टक्के अंध असणारी दोन वर्षांची मुलगी वंशिका नंदकिशोर माने हीचा युडीआयडी क्रमांक एक कोटीवा आल्यामुळे केंद्र शासनाच्यावतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांच्या हस्ते हे कार्ड वाटप करण्यात येवून 11 डिसेंबर, 2023 रोजी दिल्ली येथे तिचा गौरव करण्यात आला.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागातंर्गत देशातील दिव्यांगना युडीआयडी कार्ड देण्यात येते. आजतागायत एक कोटी कार्डचे वितरण झालेले आहे.

एक कोटीवा क्रमांक जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी येथील वंशिका नंदकिशोर माने हिला मिळाला. त्याबद्दल तिचा दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिभा भौमिक, विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वंशिकाची आई मनिषा माने व तिच्या पालकांची उपस्थिती होती.

वंशिका माने व तिच्या कुटुंबियांचा सत्कार झाल्याने जिल्हाभरात आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी लातूर जिल्ह्यात युडीआयडी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेसाठी प्राधान्याने विशेष मोहिम राबवून या कार्यालयाला गती दिली आहे. तसेच दिव्यांगांना या कार्डाद्वारे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा