जिल्हा क्रीडा संकुल येथील शिबिरात आरोग्य विभागामार्फत

ज्येष्ठ नागरिकासाठी मोफत आरोग्य तपासणी

 


लातूर, दि. 22 (जिमाका) : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि लातूर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांच्या हस्ते झाले. 

 


ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. बी. जोशी,दक्षिण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगीने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक सारडा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बरुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 


या शिबिरास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उच्च रक्तदाब, मधुमेह रक्ताच्या सर्व तपासण्या मौखिक तपासणी, नेत्र तपासणी मानसिक आरोग्य विषयी मार्गदर्शन, वयोवृद्धांसाठी योग्य आहार कसा असावा व तंबाखूच्या व्यसनांमुळे होणाऱ्या आजार या  विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी डॉ.भाग्योदय बरेवाड, डॉ. सचिन कोकणे, डॉ.सोनाली केंद्रे, आर. जी. कुलकर्णी, डॉ. माधुरी उटीकर, श्रीमती शेंडगे, अनिल वाठोरे, प्रकाश बेंबरे, अण्णाराव कुंभारे, दीपक पवार, राजाभाऊ घुले, कृष्णा राठोड, संध्याराणी सोमवंशी, संध्या शेडोळे, कैलास स्वामी, दीपक कांबळे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक सारडा यांनी केले. तसेच सूत्रसंचालन अण्णाराव कुंभारे यांनी केले, डॉ. आनंद कलमे यांनी आभार मानले.

****  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा