जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी 4 कोटी 29 लक्ष रुपयांचा कृती आराखडा · ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान होणार अंमलबजावणी

                                           जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी

4 कोटी 29 लक्ष रुपयांचा कृती आराखडा

·        ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान होणार अंमलबजावणी

लातूरदि. 07 (जिमाका) : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान पाणी टंचाई निवारणासाठी 4 कोटी 29 लाख 86 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 218 गावे आणि 125 वाड्यांसाठी 367 उपयोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पाटबंधारे प्रकल्पामध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामपंचायातींकडून पंचायत समितीकडे 11 गावांतील 15 खाजगी विहीरी आणि विंधन विहीरी अधिग्रहण करण्याबाबत मागणी केलेली असून पंचायत समितीस्तरावर त्याची पाहणी करुन 5 गावांतील 8 खाजगी विहीरीविंधन विहीरी अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित तहसील कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये लातूरऔसाअहमदपूर व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील गावांचा समावेश आहे. जानेवारी ते जून, 2024 या कालावधीचे टंचाई कृती आराखडे तयार करण्यासाठी तालुका स्तरावर टंचाईच्या आढावा बैठका आयोजित करुन टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. नळ पाणी पुरवठा योजनांसाठी विविध पाटबंधारे प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पातील अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्यात आल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 928 पैकी 190 योजनांची कामे पूर्ण

जलजीवन मिशन कार्यकमातंर्गत जिल्ह्यातील 928 योजनांना मंजूरी देण्यात आलेली असून त्यापैकी 190 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच 738 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावरील योजना तातडीने पूर्ण करून संबंधित गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई निर्माण झालेल्या गावांना तातडीने उपाययोजना करुन पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहेअसे ग्रामीणी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकरी अभियंता यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु