विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी रविवारी 24 गावांमध्ये जाणार ‘विकसित भारत संकल्प यात्रा’

 


लातूर, दि. 16 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विकसित भारत संकल्प यात्राही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत रविवार, 17 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत 17 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी नरवटवाडी, दुपारी येलदरवाडी, औसा तालुक्यात सकाळीवडजी व हसलगण, दुपारी भादा व नांदुर्गा, चाकूर तालुक्यात सकाळी कडमुळी, दुपारी जडाळा, देवणी तालुक्यात सकाळी विळेगाव, दुपारी नागतीर्थवाडी, जळकोट तालुक्यात सकाळी वांजरवाडा, दुपारी चेरा, लातूर तालुक्यात सकाळी बिंदगीहाळ व मुरुड अकोला, दुपारी बोकनगाव व रामेगाव, निलंगा तालुक्यात सकाळी शिराढोण व वाजरवाडा, दुपारी उस्तुरी व काटेजवळगा, रेणापूर तालुक्यात सकाळी रामवाडी ख., दुपारी खरोळा, उदगीर तालुक्यात सकाळी वाडवणा बु., दुपारी डांगेवाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

**** 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा