‘विकसित भारत संकल्प यात्रा’मुळे गावोगावी शासकीय योजनांचा जागर
·
जिल्ह्यात 786
ग्रामपंचायतींमध्ये उपक्रमाचे नियोजन
·
5 डिसेंबरपर्यंत 221
गावांमध्ये पोहचला संकल्प यात्रा रथ
लातूर, दि. 07 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना
समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा,
यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत
लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 786
ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जात असून
लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 5
डिसेंबरपर्यंत 221 गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहचली असून 1 लाख 1 हजार 774
नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.
ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि
शहरी भागासाठी नगर विकास विभाग ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ समन्वयक म्हणून काम करीत
आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यात्रेच्या स्वागतासाठी स्वतंत्र समिती स्थापन
करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले
आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री
आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,
स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी
योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत
असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित
लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेचे 15
डिसेंबरपर्यंतचे गावनिहाय नियोजन
जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकसित
भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. अहमदपूर तालुक्यात 8
डिसेंबर, 2023 रोजी सकाळी शिंदगी बु., दुपारी किणी कदु, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी सावरगांव थोट, दुपारी हंगरगा, 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी उन्नी
जांब, दुपारी हाडोळती, 11 डिसेंबर,
2023 रोजी सकाळी आनंदवाडी, दुपारी सय्येदपूर खु., 12 डिसेंबर, 2023 सकाळी
बोडका, दुपारी आंबेगाव, 13 डिसेंबर, 2023
सकाळी कुमठा बु., दुपारी कौडगाव, 14 डिसेंबर, 2023 सकाळी बाबळदरा, दुपारी शिवणखेड, 15 डिसेंबर, 2023
सकाळी वायगाव आणि दुपारी गादेवाडी येथे ही यात्रा जाईल.
औसा तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
जयनगर, दुपारी
आपचूंदा, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी किनीथोट, दुपारी येळी, 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी भंगेवाडी,
दुपारी सारोळा, 11 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
एरंडी, दुपारी आलमला, 12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी सततधरवाडी,
दुपारी उंबडगा बु., 13 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
उंबडगा खु., दुपारी उटी, 14 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी लखनगाव, दुपारी काळमाथा, 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
कवठा केज, दुपारी भेटा येथे भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
चाकूर तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
उजळंब, दुपारी
भाटसांगवी, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी बनसावरगाव, दुपारी बोळेगाव, 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
तिवटघाळ, दुपारी तीवघाळ,
11 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी अजन्सोंडा, दुपारी जानवळ,
12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी रायवाडी, दुपारी
रामवाडी, 13 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी केंद्रेवाडी खु.,
दुपारी महाळंगी, 14 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
झरी, दुपारी दापक्याळ, 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी शिवणी म.
केज आणि दुपारी हाडोळी येथे यात्रा जाणार आहे.
देवणी तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
गुरनाळ, दुपारी
गौडगाव, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी बटनपूर, दुपारी लासोना, 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी बोरोळ,
दुपारी सिंध्दीकामठ, 11 डिसेंबर, 2023 रोजी
सकाळी हंचनाळ, दुपारी वागदरी, 12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
अजनी, दुपारी संगम, 13 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी सावरगाव, दुपारी होनाळी, 14 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी भोपनी, दुपारी मानकी, 15 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी डोंगरेवाडी, दुपारी नेकनाळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाईल.
जळकोट तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
रावणकोळा, दुपारी हळद वाढवणा, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी पाटोदा बु., दुपारी कोळनुर, 10
डिसेंबर, 2023 रोजी सकाळी सोनवळा, दुपारी
कोनाळी डोंगर, 11 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी मंगरुळ, दुपारी
बोरगाव, 12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी लाळी खु., दुपारी बेळसांगवी, 13 डिसेंबर, 2023 सकाळी येवरी,
दुपारी लाळी बु., 14 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
ढोरसांगवी, दुपारी धामणगाव, 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
हावरगा आणि दुपारी येलदरा येथे यात्रा जाणार आहे.
लातूर तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
भातखेडा, दुपारी
ममदापूर, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी भाडगाव, दुपारी रमजनापूर, 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी उमरगा,
दुपारी बोरी, 11 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी शिवणी खु . दुपारी सेलू बु., 12
डिसेंबर, 2023 रोजी सकाळी धनेगाव, दुपारी
सोनवती, 13 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी बाभळगाव, दुपारी सिरसी, 14 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी कातपूर, दुपारी सिंकदरपूर, 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी मळवटी आणि दुपारी कोळपा येथे विकसित
भारत संकल्प यात्रा पोहोचणार आहे.
निलंगा तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
हंद्राळ व अंबुलगा, दुपारी
हालसी हा व शेंद, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी हणमंतवाडी व निटूर,
दुपारी वाडीकासारशिरसी व ताजपूर, 10 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी कोराळी व डांगेवाडी, दुपारी नेलवाड व ढोबळेवाडी, 11
डिसेंबर, 2023 रोजी सकाळी मिरगनहळही व कलांडी, दुपारी
देवीहल्लाळी व बसपूर, 12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी ममतदापूर
व केळगाव, दुपारी तांबाळा व खडकउमरगा, 13 डिसेंबर, 2023 रोजी
सकाळी कासार बालकुंदा व दापका, दुपारी पिरुपटेलवाडी व लांबोटा, 14 डिसेंबर,
2023 रोजी सकाळी चिलवंतवाडी व गुऱ्हाळ, दुपारी मोळगाव क आणि जाऊ, 15 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी कलमुगळी व जाजणूर, दुपारी
टाकळी आणि तळीखेड येथे संकल्प यात्रेंतर्गत उपक्रम होतील.
रेणापूर तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
बिटरगाव, दुपारी
फरदपूर, 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी गरसुळी, दुपारी वाला, 10 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी तत्तापूर,
दुपारी कामखेडा, 11 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
कोळगाव, दुपारी निवाडा, 12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी शेरा,
दुपारी कुंभारी, 13 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
सुमठाणा, दुपारी समसापूर, 14 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी गव्हाण दुपारी हरवाडी, 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
सेलू, दुपारी जवळगा विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी अजनी
बु., दुपारी कळमगाव,
9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी होनमाळ, दुपारी बेवनाळ, 10 डिसेंबर,
2023 रोजी सकाळी हालकी, दुपारी तळेगाव बोरी, 11
डिसेंबर, 2023 रोजी सकाळी उमरदरा, दुपारी वांजरखेडा, 12
डिसेंबर, 2023 सकाळी हिसामाबाद, दुपारी
डोंगरगाव बोरी, 13 डिसेंबर, 2023 सकाळी अंकुलगा सय्यद,
दुपारी तुरुकवाडी, 14 डिसेंबर, 2023 सकाळी
हाणमंतवाडी, दुपारी कांबळगाव, 15 डिसेंबर, 2023 सकाळी
आनंदवाडी, दुपारी हिप्पळगाव येथे यात्रा जाईल.
उदगीर तालुक्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी दिग्रस, दुपारी करडखेल, 9 डिसेंबर,
2023 रोजी सकाळी हेर, दुपारी कुमठा, 10
डिसेंबर, 2023 रोजी सकाळी लोहारा, दुपारी
मलकापूर, 11 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी तिवटग्याळ, दुपारी
हैबतपूर, 12 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी तोंडार, दुपारी लोणी, 13 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी सोमनाथपूर,
दुपारी क्षेत्रफळ, 14 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी
हंगरगा, दुपारी होणीहिप्परगा, 15 डिसेंबर, 2023 सकाळी डाऊळ
आणि दुपारी डोंगरशेळकी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
*****
Comments
Post a Comment