विलासराव देशमुख शासकीय परिचर्या महाविद्यालयात विद्यार्थी परिचारिकांसाठी कार्यशाळा उत्साहात

                                               विलासराव देशमुख शासकीय परिचर्या महाविद्यालयात

विद्यार्थी परिचारिकांसाठी कार्यशाळा उत्साहात

 


लातूर, दि. 27 (जिमाका):  येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी परिचारिकांसाठी तृतीय वर्ष परिचारिका विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत परिचारिका विद्यार्थ्यांना असंसर्गजन्य आजारावर विविध प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर  व्याख्यान देण्यात आले

कार्यशाळेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी परिचारिका विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी बेले ह्या होत्या. 

प्रमुख उपस्थिती रुग्णालयाच्या अधिसेविका राजश्री हरंगुळे व लक्ष्मी आपटे, तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या मुख्य अधिसेविका अमृता पोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी विशेषतज्ञ व मार्गदर्शक म्हणून बधिरीकरणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्यंकटेश जोशी व सहाय्यक प्राध्यापक जगदीश नाईक, तसेच कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या डॉ. विमल डोळे, तर औषधीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापकडॉ. दीपक पाटील यांनी या कार्यशाळेत विविध विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी हांगे व साक्षी गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य  सुकुमार गुडे यांनी केले. समारोप पाठनिर्देशिका अंजना गिरी यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मीनाक्षी गुळवे, पंकजा चव्हाण व उनिता देशमाने तसेच तृतीय वर्षाच्या परिचारिका विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु